Advertisement

हुबेहूब आठवले!

आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह इथं करण्यात आलं. हा मेणाचा पुतळा वॅक्स कलाकार सुनील कंडलूर यांनी अगदी हुबेहूब साकारला आहे.

हुबेहूब आठवले!
SHARES

राजकारणी कम कवी अशी ओळख निर्माण केलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले लवकरच सेलिब्रिटी, स्पोर्ट्सपर्सन आणि राजकारणातील दिग्गज व्यक्तीमत्त्वांच्या पंगतीत जाऊन बसणार आहेत. हे कसं काय? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर त्याचं उत्तर असं आहे की आठवले यांचा एक मेणाचा पुतळा साकारण्यात आला असून हा पुतळा लोणावळ्यातील सुनील सेलिब्रिटी वॅक्स म्युझिअममध्ये ठेवण्यात येणार आहे.

आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह इथं करण्यात आलं. हा मेणाचा पुतळा वॅक्स कलाकार सुनील कंडलूर यांनी अगदी हुबेहूब साकारला आहे.काय आहे खासियत?

आठवले यांचा हा पुतळा २५ किलो मेणाचा वापर करून बनवण्यात आला आहे. केरळ येथील वॅक्स कलाकार सुनिल कंडलूर यांनी हा पुतळा साकारला आहे. त्यांनी लोणावळ्यात सुरू केलेल्या सुनील सेलिब्रेटी वॅक्स म्युझियममध्ये हा पुतळा ठेवण्यात येणार आहे.


 


कोण आहे जोडीला?

या म्युझियममध्ये आठवले यांच्या जोडीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, ज्येष्ठ क्रिकेटर कपिल देव, महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता जॉकी श्राॅफ, पॉप गायक मायकल जॅक्सन अशा ९० हून अधिक सेलिब्रिटींच्या मेणाच्या पुतळ्यांचा समावेश आहे.हेही वाचा-

तर, संभाजी भिडेंना अटक करा- रामदास आठवले

महिलांनाही त्यांची बाजू मांडण्यासाठी हक्काची जागा मिळावी - रामदास आठवले


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा