राऊतांशी नाही तर उद्धवशी बोलतो - मुख्यमंत्री

 Pali Hill
राऊतांशी नाही तर उद्धवशी बोलतो - मुख्यमंत्री

मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपनं चांगलीच बाजी मारली. त्यानंतर मंगळवारी भाजपानं मुंबईत सेलिब्रेशन केलं. यासंदर्भातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली.

"भाजपाच नंबर वन आहे हे जनतेनं दाखवून दिलं. महाराष्ट्रातील नगरपालिकांमध्ये मिळालेला विजय ही फक्त लाट नाही तर ही त्सुनामी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचं मी मनापासून आभार मानतो. भाजपाचा हा विजय महाराष्ट्राला अर्पण करतो," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पण हे म्हणत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर कुरघोडी करण्याची संधी त्यांनी सोडली नाही. संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मी उद्धव ठाकरेशी बोलतो, संजय राऊत यांच्याशी नाही, असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला.

तर "राज्यातील निवडणुकांमध्ये युती असावी या मताचे आम्ही आहोत," असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलं.

Loading Comments