Advertisement

मराठी भाषेचं वाकडं कोण करणार? मुख्यमंत्री

मराठी भाषा दिवस हा एका दिवसापुरता आणि वर्षापुरता मर्यादित न ठेवता आपलं संपूर्ण आयुष्य मराठी कसं राहीलं याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठी भाषेचं वाकडं कोण करणार? मुख्यमंत्री
SHARES

जेव्हा जेव्हा आपल्यावर संकटं आली तेव्हा मराठी मदतीसाठी धावून आली. पण आज शाळांमध्ये मराठी सक्तीची का करावी लागते? एकेकाळी मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज आला की शत्रूची पळापळ व्हायची. त्या मराठी भाषेचं वाकडं करण्याची कोणाची टाप आहे? असा सवाल विचारत मराठी भाषा दिवस हा एका दिवसापुरता आणि वर्षापुरता मर्यादित न ठेवता आपलं संपूर्ण आयुष्य मराठी कसं राहीलं याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा- ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ राज्यातही राबवणार- छगन भुजबळ

विधानभवनात (vidhan bhavan) ‘मराठी भाषा गौरव दिन’ (Marathi bhasha gaurav din) कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, काय होणार मराठीचं हा केविलवाणा प्रश्न आपण विचारू नये, कारण मराठी ही स्वराज्य घडवणारी भाषा आहे. मराठी भाषा ही साधीसुधी नाही. शक्ती आणि भक्तीची ही भाषा आहे. स्वातंत्र्य चळवळीदरम्यान ‘सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का’ हे विचारणारी ही मराठी भाषा होती. त्यामुळं मराठी भाषा दिवस चिंतित मनानं साजरा करण्याची गरज नाही.  

मी शाळेत असताना माझी आई माझ्याकडून पाटीवर अ आ इ ई गिरवून घ्यायची. मराठी भाषा ही शुद्ध बोलली गेलीच पाहिजे, तशी ती शुद्ध लिहिलीही गेली पाहिजे. एवढंच नाही, तर ऱ्हस्व दीर्घाप्रमाणेच ती उच्चारली गेली पाहिजे, असा माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा कटाक्ष होता. पण आज शाळांमध्ये मराठी सक्तीची का करावी लागते? राज्यातील शाळांची नावं मराठीत का नाहीत? असा प्रश्न विचारत मराठी भाषेचा कायदा करण्याचा योगायोग माझ्या काळात आला हे माझं भाग्य की नाईलाज मला माहीत नाही. अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

हेही वाचा- सर्व शाळांत मराठी विषय सक्तीचा, न शिकवल्यास १ लाखांचा दंड

आम्ही लहान असताना सकाळी वासुदेवांची गाणी ऐकायला मिळायची. पण नव्या पिढीला यातील अनेक गोष्टी माहीत नाहीत. ऐकतो मराठी, बोलतो मराठी तसं मराठी ही पाहिलीही गेली पाहिजे,” असंही त्यांनी नमूद केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा