‘स्थायी’ यशाच्या प्रयत्नात...

 Pali Hill
‘स्थायी’ यशाच्या प्रयत्नात...
Pali Hill, Mumbai  -  

दादर - कोण किरीट सोमय्या? भाजपा खासदार किरीट सोमय्या यांना चक्क एक लोकप्रतिनिधी ओळखत नाही. किरीट सोमय्या यांना अनुल्लेखानं मारु पाहणारे लोकप्रतिनिधी आहेत मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर उर्फ शैलेश फणसे. स्थायी समिती अध्यक्षपदाची हॅट्ट्रिक साधणारे फणसे ‘उंगली उठाओ’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बुधवारी ‘मुंबई लाइव्ह’ कार्यालयात आले होते. मुंबई महानगरपालिकेची स्थायी समिती ही नगरसेवकांचं उखळ पांढरं करण्याचं साधन असल्याचा सर्वसामान्य मुंबईकरांचा गैरसमज आहे. पालिका निवडणुकीची आचारसंहितेची ढाल बनवून प्रशासनानं सरासरी नव्वद विकासकामांचे प्रस्ताव समितीसमोर मंजूरीसाठी ठेवले. आम्हाला नाईलाजाने ते मंजूर करावे लागले. मुंबईतला मराठी टक्का वाढवण्यासाठी आणि इथली शिक्षण तसंच वाहतूक व्यवस्था अधिक सुधारण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. खड्डेमुक्त मुंबईसाठी आपण प्रयत्नशील असल्याचा दावा करणाऱ्या शैलेश फणसे यांनी रस्त्यावरच्या खड्ड्यांसाठी केवळ पालिकेला जबाबदार मानलं जाऊ नये, हे आवाहनही केलं.

Loading Comments