Advertisement

ई वॉर्डमध्ये काँग्रेस, शिवसेनेचा 2 जागांवर विजय


ई वॉर्डमध्ये काँग्रेस, शिवसेनेचा 2 जागांवर विजय
SHARES

सीएसटी - ई वॉर्डमध्ये 7 जागांच्या लढतीत काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी 2 जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. ई वॉर्डमध्ये भाजपाचा 1 उमेदवार, समाजवादी पक्षाचे 1 उमेदवार, अखिल भारतीय सेनेचा 1 उमेदवार विजयी झालेे आहेत.

207 प्रभागातून भाजपाच्या सुरेखा लोखंडे 6 हजार 5 मतांनी विजयी झाल्या. 208 प्रभागातून शिवसेनेचे रमाकांत रहाटे तर 209 प्रभागातून शिवसेनेचे यशवंत जाधव विजयी झाले आहेत. 211 प्रभागात समाजवादी पक्षाच्या रईस शेख यांचा 9 हजार 455 मतांनी विजय झाला आहे. अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांचा पुन्हा एकदा 212 प्रभागातून विजय झाला आहे. 213 मधून काँग्रेसच्या जावेद जुनेजा यांनी विजय मिळवत आपले नगरसेवक पद कायम राखले. 210 प्रभागातून काँग्रेसच्या उमेदवार सोनम जामसुतकर यांचा 9 हजार 589 मतांनी विजय झाला आहे.

संबंधित विषय
Advertisement