काँग्रेसला धक्का

 Malad
काँग्रेसला धक्का

मालाड - दिंडोशी काँग्रेसचे नगरसेवक भोमसिंग राठोड यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला, त्यापाठोपाठ मालाडचे काँग्रेसचे पदाधिकारी आणि मालाड कोळी समाजाचे नेते सुनील कोळी यांनी भाजपात रविवारी संध्याकाळी प्रवेश केला आहे. मालाड काँग्रेस विधानसभेतील अंतर्गत वादाला त्रासल्याने कोळींनी उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय. सुनील कोळी यांच्या भाजप प्रवेशामुळे जवळपास 50 टक्क्यांहून अधिक कोळी समाजाची मते आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्या खिशात जाणार आहे हे नक्की. मालवणी येथील वॉर्ड क्रमांक 33 हा ओबीसी समाजासाठी राखीव असल्यामुळे कोळी तेथून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे कळते. मात्र पक्षाने निवडणूक लढवण्यास सांगितली तरच निवडणुक लढवणार. अन्यथा पक्षासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading Comments