• निर्धार सभेत 'हम सब एक है' चा नारा
SHARE

नायगाव - वडाळा काँग्रेस विधान सभाक्षेत्रातील शिवडी क्रॉस रोड येथील राहुल नगर येथे निर्धार सभा आणि विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. काँग्रेसकडून यावेळी ‘हम सब एक है’ चा नारा देण्यात आला. यावेळी विभागातील 5 हजार विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार कालिदास कोळंबकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. गेल्या पाच वर्षांपासून रेल्वे लगतच्या परिसरातील रखडलेली विकासाची कामे रेल्वेकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानं यंदा मार्गी लावण्यात येणार असल्याचे आश्वासन आमदार कालिदास कोळंबकर यांनी दिले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या