Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

विधानसभा अध्यक्षपदावर केवळ काँग्रेसचाच हक्क- बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदावर केवळ काँग्रेसचाच हक्क असल्याचं वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.

विधानसभा अध्यक्षपदावर केवळ काँग्रेसचाच हक्क- बाळासाहेब थोरात
SHARES

नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर काँग्रेससोबतच (congress) शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील दावा करत असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. काहीही असलं, तरी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदावर केवळ काँग्रेसचाच हक्क असल्याचं वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. एवढंच नाही, तर लवकरच तिन्ही पक्षांतील नेते मिळून यावर निर्णय असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी गेल्या आठवड्यात विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे. नाना पटोले राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. 

त्यासंदर्भात बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांना विचारलं असता ते म्हणाले, सत्तावाटपाच्या सूत्रानुसार काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपद आलेलं आहे. त्यामुळे सहाजिकच या पदावर काँग्रेसचा हक्क आहे. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांना काहीही अर्थ नसून या पदावर काँग्रेसच्याच नेत्याची नियुक्ती होईल, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. येत्या १ मार्चपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधी तिन्ही पक्षांतील प्रमुख नेते मिळून यावर निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं. 

हेही वाचा- भाजपच्या विरोधानंतर शिवजयंतीच्या नियमात बदल, 'अशी' आहे नवी नियमावली

महाराष्ट्र काँग्रेसचं अध्यक्षपद काढून घेतल्यामुळे नाराज असल्याच्या चर्चांवर भाष्य करताना बाळासाहेब थोरात म्हणाले, अध्यक्षपद काढून घेतल्यामुळे मला वाईट वाटलेलं नाही. कारण आधीच माझ्याकडे महसूलमंत्रीपद, विधीमंडळ नेता ही पदं असून मी काँग्रेसच्या अखिल भारतीय कार्य समितीचा सदस्य देखील आहे. शिवाय इतरही अनेक पदं माझ्याकडे आहेत. त्यामुळे माझ्याच एका सहकाऱ्याला पद दिल्यास वाईट वाटण्याचं कारण नाही. उलट माझे सहकारी मिळालेल्या संधीचा पक्षाच्या वाढीसाठी पुरेपुर उपयोग करून घेतील, अशी अपेक्षा आहे. 

काँग्रेस विधानसभा अध्यक्षपदाच्या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारेल आणि हे पद शिवसेनेकडे (shiv sena) सुपूर्द करेल. तसंच काँग्रेसमधून उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत तुमचचं नाव पुढं असल्याबद्दल विचारलं असता, या चर्चा केवळ माध्यमांमध्ये सुरू असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले.

(congress leader and revenue minister balasaheb thorat claims on maharashtra vidhan sabha president post)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा