शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना भारतरत्न द्या, काँग्रेसचं पंतप्रधानांना पत्र

शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन गौरवण्यात यावं अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांनी केली आहे.

SHARE

शहीद  भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन गौरवण्यात यावं अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांनी केली आहे.

यासंदर्भात तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यामध्ये, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांना भारतरत्न पुरस्कारासह अधिकृतरित्या ‘शहीद-ए-आजम’ म्हणून घोषित करावं, अशी मागणी केली आहे.

सोबतच या पत्रात तिवारी यांनी,

“पंजाबमधील मोहालीस्थित विमानतळाचं ‘शहीद-ए-आजम भगतसिंग विमानतळ’ असं नामकरण करावं, यामुळे १२४ कोटी भारतीयांना आनंद होईल”, असंही लिहिलं आहे. पंतप्रधान मोदींना पाठवलेलं हे पत्र तिवारी यांनी ट्विटरवर देखील शेअर केलं आहे. या पत्राला नेटकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासोबत वीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळावं यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं होतं.


त्यावर टीका करताना मनिष तिवारी यांनी वीर सावरकर यांना भारतरत्न दिल्यास उद्या भाजप नथुराम गोडसे यांनाही भारतरत्न देण्यास मागंपुढं पाहणार नाही, अशी टीका केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून करण्यात आलेली ही मागणी महत्त्वाची ठरते.


हेही वाचा-

वीर सावरकरांना भारतरत्न म्हणजे शहीद भगसिंगचा अपमान- कन्हैया कुमार

सावरकरांचं नाव घेतल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पोटात का दुखतं? - अ‍ॅड. आशिष शेलारसंबंधित विषय
ताज्या बातम्या