Advertisement

वीर सावरकरांना भारतरत्न म्हणजे शहीद भगसिंगचा अपमान- कन्हैया कुमार

“वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ दिल्यास हा शहीद भगतसिंग यांच्या बलिदानाचा मोठा अपमान ठरेल”, अशा शब्दांत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा युवा नेता कन्हैया कुमार याने वीर सावरकरांना भारतरत्न देण्यास जोरदार विरोध केला आहे.

वीर सावरकरांना भारतरत्न म्हणजे शहीद भगसिंगचा अपमान- कन्हैया कुमार
SHARES

“वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ दिल्यास हा शहीद भगतसिंग यांच्या बलिदानाचा मोठा अपमान ठरेल”, अशा शब्दांत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा युवा नेता कन्हैया कुमार याने वीर सावरकरांना भारतरत्न देण्यास जोरदार विरोध केला आहे. 

भाजपच्या जाहीरनाम्यात

भाजपने आपल्या जाहीरनाम्यात 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना 'भारतरत्न' मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. नगरमधील भाकपचे उमेदवार बहिरनाथ वाकळे यांच्या प्रचारासाठी आलेल्या कन्हैया कुमारने या आश्वासनावर निशाणा साधताना म्हटलं की, 

महाराष्ट्रात निवडणुका होत असल्या, तरी राज्यातील प्रश्नावर कोणीही बोलायला तयार नाही.  इथं नोकऱ्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न तसेच आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपने दिलेल्या आशासनांपैकी किती पूर्ण झाली याचा हिशेब कोणीच विचारत नाही. भाजपही त्यावर काही बोलत नाही.

 भाजपकडून भावनिक मुद्द्यांचा वापर केला जात आहे. ३७०, राममंदिर हेच मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यातच भाजपने वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचं आश्वासन म्हणजे शहीद भगतसिंग यांच्या बलिदानाचा एकप्रकारे अवमानच आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि इतर नेते 'ईडी'च्या भीतीने गांधीजींऐवजी सोडून नथुराम गोडसेची स्तुती करायला लागले आहेत,' असं कन्हैया म्हणाला.

हेही वाचा- 

येत्या ५ वर्षात महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करणार- भाजपचा संकल्पपत्र जाहीर

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही आम्हीच ठरवणार : अमित शाह

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा