मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही आम्हीच ठरवणार : अमित शाह

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

SHARE

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेत वाद होण्याचीही चिन्हे आहेत. राज्यात भाजपाचाच मुख्यमंत्री असेल आणि उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम घेईल असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या चर्चा रंगल्या होत्या. युतीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री भाजपाच असेल. मात्र, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद हवं आहे. अमित शहा यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम घेईल, असं म्हटल्याने शिवसेनेकडून यावर काय प्रतिक्रिया येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

महाराष्ट्रात शिवसेना- भाजपा युतील बहुमत मिळेल याबाबत शंका नाही. पण भाजपाला स्वबळावर बहुमत मिळेल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.  शिवसेनेनेही राज्यात मुख्यमंत्रिपदाचा दावा केला आहे. यावर बोलताना अमित शाह म्हणाले, शिवसेनेच्या या दाव्यामुळे  युतीला कोणताही धोका नाही. नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हेच भाजपाकडून मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील.हेही वाचा  -

भाजपा-शिवसेना राज्यात ताटं वाट्या घेऊन फिरतेय- राज ठाकरे

राष्ट्रवादीकडून 'ही' होती एकनाथ खडसे यांना ऑफर, खडसेंनी केला गौप्यस्फोट
संबंधित विषय
ताज्या बातम्या