Advertisement

येत्या ५ वर्षात महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करणार- भाजपचा संकल्पपत्र जाहीर


येत्या ५ वर्षात महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करणार- भाजपचा संकल्पपत्र जाहीर
SHARES
Advertisement

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपला जाहीरनामा मंगळवारी प्रकाशित केला आहे.'संपन्न, समृद्ध, समर्थ महाराष्ट्राचे संकल्प पत्र' या शिर्षकाखाली भाजपनं निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे. जाहीरनामा प्रकाशित करतेवेळी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र, रोजगारनिर्मिती, प्रत्येकाला घराला शुद्ध पाणी आणि पायाभूत सुविधांवर भर देण्यात आल्याचं म्हटलं. तसंच, भविष्यातील आव्हानांचा विचार करून भाजपनं संकल्पपत्र तयार केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. 

जाहीरनामा प्रकाशित करतेवेळी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भाजपनं संकल्पपत्र प्रकाशित केलं. येत्या ५ वर्षांत १ कोटी रोजगार निर्माण करणार. संपूर्ण महाराष्ट्र इंटरनेटनं जोडणार तसंच आयआयटी, आयआयएम आणि एम्ससारख्या नव्या संस्था उभारणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

संकल्प पत्रातील काही प्रमुख आश्वासनं

 • येत्या ५ वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार.
 • पश्चिम वाहिनी नद्यांमधून वाहून जाणारे १६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात नेणार. तर वैनगंगेच्या वाहून जाणाऱ्या पाण्यातून पश्चिम विदर्भ दुष्काळमुक्त करणार.
 • मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्त्वाकांशी योजनेत ११ धरणं जोडून संपूर्ण मराठवाद्यात बंद पाईपद्वारे पाणी पुरवठा करणार
 • कृष्णा, कोयना व अन्य नद्यांमधून पावसाळी पुरांमुळे वाहून जाणारे जादा पाणी पश्चिम महाराष्ट्राच्या कायम दुष्काळी भागाकडे वळवणार.
 • आगामी पाच वर्षांत शेतीला लागणारी वीज सौर ऊर्जेवर आणून शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळेल हे सुनिश्चित करू. त्या करता राज्यात शेतीच्या सिंचन सुविधेला सौर ऊर्जेची जोड देण्यासाठी सोलर पॉवर ग्रीड निर्माण करणार.
 • येत्या ५ वर्षांत एक कोटी रोजगार निर्मिती करणार.
 • २०२२पर्यंत प्रत्येक बेघराला घर आणि प्रत्येक घराला पिण्याचे शुद्ध पाणी देणार.
 • पायाभूत सुविधांमध्ये केंद्र सरकारच्या मदतीने पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार.
 • एक कोटी कुटुंबांना महिला बचत गटांशी जोडून रोजगाराच्या विशेष संधी उपलब्ध करून देणार.
 • राज्यातील सर्व प्रकारच्या रस्त्यांची कायमस्वरूपी देखभाल दुरुस्ती करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार.
 • महात्मा ज्योतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा 'भारतरत्न' पुरस्काराने गौरव व्हावा यासाठी प्रयत्न करणार.
 • भारतनेट आणि महानेटच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला इंटरनेटने जोणार.हेही वाचा -

पीएमसी बँक घोटाळ्यातील माजी अध्यक्षाकडं 'इतकी' संपत्ती

PMC घोटाळा : ९० लाख रुपये अडकलेल्या खातेदाराचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यूसंबंधित विषय
Advertisement