Advertisement

करिना कपूर निवडणुकीच्या रिंगणात?


करिना कपूर निवडणुकीच्या रिंगणात?
SHARES

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला धूळ चारत सत्ता काबीज केली आहे. तर आता मध्य प्रदेशातील काँग्रेसचे नेते-पदाधिकारी लोकसभेच्या तयारीला लागले असून भोपाळमधील काही नगरसेवकांनी चक्क बाॅलीवूड अभिनेत्री बेबो अर्थात करिना कपूरचं नाव निवडणुकीसाठी पुढं केल्याची चर्चा आहे. भोपाळमधून करिना कपूरला लोकसभेचं तिकिट द्यावं असा आग्रहच त्यांनी धरल्याचं समजतं आहे. त्यामुळे आता करिना कपूर काय निर्णय घेते, ती निवडणुकीच्या रिंगणात उतरते का? याकडेच सर्वांच लक्ष लागलं आहे.


भाजपला हरवण्याची तयारी 

पतौडी घराणं हे भोपाळमधील राजघराणं असून करिना कपूर ही पतौडी घराण्याची सून आहे. तर करिना कपूरच्या चाहत्यांची कमी भोपाळमध्ये नाही. त्यातच भोपाळमधील जागेवर भाजपाचं गेल्या कित्येक वर्षांपासून वर्चस्व आहे. अशावेळी जर भाजपाला हरवायचं असेल तर तरूणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या करिना कपूरला निवडणूक रिंगणात उतरावं असं भोपाळमधील काही नगरसेवकांचं म्हणणं आहे.


नेते, उमेदवार नसल्यानं सेलिब्रिटींचा आधार

या मागणीसाठी आता भोपाळमधील हे नगरसेवक लवकरच मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेणार असल्याचंही समजतं आहे. आता केवळ करिना कपूरचं नाव समोर आलं असून त्यावर शिक्कामोतर्ब होऊन करिना कपूरचा होकार येणं महत्त्वाचं आहे. मात्र त्याआधीच भाजपानं मात्र यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसकडे नेते, उमेदवार नसल्यानं त्यांना अशाप्रकारे सेलिब्रिटींचा आधार घ्यावा लागत असल्याचं म्हणत भाजपानं काँग्रेसवर टीका केली आहे. दरम्यान करिना कपूरचे सासरे मंसुर अली खान पतौडी खान यांनी १९९१मध्ये भोपाळ मतदारसंघातून निवडणुक लढवली होती. मात्र त्यांना त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता.



हेही वाचा -

खंडाळ्यातील शेतकरी मंत्रालयात, तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र

भारताला झटका, मेहुल चोक्सीनं सोडलं भारतीय नागरिकत्व



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा