भाजपा सरकारविरोधात काँग्रेसचा मोर्चा

 Dadar
भाजपा सरकारविरोधात काँग्रेसचा मोर्चा
Dadar , Mumbai  -  

मध्य प्रदेश पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली. या निषेधार्थ गुरुवारी काँग्रेसने मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखील मोर्चा काढला. टिळकभवन ते सेनापटी बापट मार्गापर्यंत काढण्यात आलेल्या मार्चामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली.

भाजपा सरकारची वाटचाल लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे सुरू आहे अशी घणाघाती टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यावेळी केली. यावेळी काँग्रेस नेत्यांनी भाजपा विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

सरकार शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला कारणीभूत आहे. कोणत्याही व्यक्तीला कायदे हातात घेण्याचे अधिकार नाहीत. या सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही, अशा सरकारचा आम्ही निषेध करतो, असे मत यावेळी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. दरम्यान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्यासह अनेक काँगेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Loading Comments