Advertisement

भूमिपूजनाला संजय निरुपम यांची दांडी


भूमिपूजनाला संजय निरुपम यांची दांडी
SHARES

दहीसर - केतकीपाडा येथे शौचालय आणि इतर दोन विकासकामांचे भूमिपूजन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम आणि आमदार असलम शेख यांच्या हस्ते सोमवारी होणार होते. मात्र या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी दांडी मारल्याने स्थानिक नेत्यांनीच भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकून घेतला. दहीसर पूर्व येथील केतकीपाडा धारखाडी वॉर्ड क्र.3 मधील भाग हा वनखात्याच्या अंतर्गत येतो. मात्र काँग्रेसचे नेते अभय चौबे यांनी वनखात्याकडून विकासाच्या कामांची परवानगी मिळवून त्या जागी शौचालय बांधण्याची परवानगीही मिळवली. ज्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सोमवारी संध्याकाळी ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुंबई अध्यक्ष संजय निरूपम, आमदार असलम शेख, मुंबई महिला अध्यक्षा शीतल म्हात्रे हजर राहणार होते. मात्र या तिन्ही नेत्यांनी दांडी मारल्याने संदेश कोंडविलकर आणि अभय चौबे यांनी भूमिपूजन केले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा