Advertisement

tiktok app: टिकटॉकने ‘पीएम केअर्स’ला दिलेले ३० कोटी हा क्रांतीचा भाग होता का? - सचिन सावंत

टिकटॉकने ‘पीएम केअर्स’ला ३० कोटी रुपयांचा निधी दिला तो क्रांतिचा भाग होता का? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

tiktok app: टिकटॉकने ‘पीएम केअर्स’ला दिलेले ३० कोटी हा क्रांतीचा भाग होता का? - सचिन सावंत
SHARES

केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं धोकादायक ठरण्याची शक्यता असलेल्या ५९ चिनी मोबाईल अॅपवर नुकतीच बंदी घातली आहे. या निर्णयानंतर सरकारचं कौतुक करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला हाणताना याआधी टिकटॉकने ‘पीएम केअर्स’ला ३० कोटी रुपयांचा निधी दिला (congress spokesperson sachin sawant ask questions to bjp over pm cares funding from tiktok app) तो क्रांतिचा भाग होता का? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. 

चिनी अॅपवरील बंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना, देश आता सुरक्षित हातांमध्ये आहे आणि भारताची डिजिटल सुरक्षा आता कोणीही ओलांडू शकत नाही. या क्रांतिकारक निर्णयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे मनःपूर्वक आभार, असं ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केलं होत.

या निर्णयाला लक्ष्य करत सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांना काही प्रश्न विचारले आहेत. म्हणजे ६ वर्षे देश असुरक्षित हाती होता का व डिजिटल असुरक्षा होती का? टिकटॉकने PMCARES ला ३० कोटी रुपये दिले तो क्रांतिचा भाग होता का? mygovindia  TIKTOK वर २० दिवसांपूर्वी आणण्यावेळी डिजिटल सुरक्षा होती का? तसंच मोदींनी जाहिरात केलेल्या Paytm चं काय?, असे हे प्रश्न आहेत. 

हेही वाचा - NaMo App: आधी ‘नमो’ अॅप बंद करा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

याआधी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील आपल्या ट्विटद्वारे भाजपला लक्ष्य केलं आहे. १३० कोटी भारतीयांची खाजगी माहिती धोक्यात असल्याचा दाखला देत भाजप सरकारने ५९ मोबाईल अ‍ॅपवर बंदी घातली आहे. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारं, परस्पर खाजगी सेटिंग बदलणारं आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारं NaMo अ‍ॅप देखील बंद केलं पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.    

५९ चिनी (Chinese App Ban) मोबाईल अॅपवर (Chinese mobile app) केंद्र सरकारकडून नुकतीच बंदी घालण्यात आली आहे. मोदी सरकारनं (modi government) भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेला धोका पोहोचू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. TikTok आणि Helo या लोकप्रिय अॅप्सचा (Mobile apps) यात समावेश आहे.

देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. चीनकडून सायबर अटॅकची भीती गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होती. त्यावर उपाय म्हणून या चिनी अॅप्सवर बंधनं नव्हे तर बंदीच (Chinese App Ban) घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा