Advertisement

NaMo App: आधी ‘नमो’ अॅप बंद करा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारं नमो (NaMo) अ‍ॅप बंद करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

NaMo App: आधी ‘नमो’ अॅप बंद करा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
SHARES

चिनी कंपन्यांच्या अॅपसोबतच वापरकर्त्यांची माहिती गोळा करून, परस्पर खाजगी सेटिंग बदलून आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारं नमो (NaMo) अ‍ॅप बंद करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे (congress leader prithviraj chavan demands to ban on NaMo app) केली आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून ही मागणी करताना चव्हाण यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे.

आपल्या ट्विटमध्ये पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, १३० कोटी भारतीयांची खाजगी माहिती धोक्यात असल्याचा दाखला देत भाजप सरकारने ५९ मोबाईल अ‍ॅपवर बंदी घातली आहे. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारं, परस्पर खाजगी सेटिंग बदलणारं आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारं NaMo अ‍ॅप देखील बंद केलं पाहिजे.

हेही वाचा- Chinese App Ban : TikTok, Helo सह ५९ चायनीज मोबाईल अॅपवर बंदी

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं धोकादायक ठरण्याची शक्यता असलेल्या ५९ चिनी (Chinese App Ban) मोबाईल अॅपवर (Chinese mobile app) केंद्र सरकारकडून नुकतीच बंदी घालण्यात आली आहे. मोदी सरकारनं (modi government) भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेला धोका पोहोचू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. TikTok आणि Helo या लोकप्रिय अॅप्सचा (Mobile apps) यात समावेश आहे.

देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. चीनकडून सायबर अटॅकची भीती गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होती. त्यावर उपाय म्हणून या चिनी अॅप्सवर बंधनं नव्हे तर बंदीच (Chinese App Ban) घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

देशवासीयांची सायबर स्पेस सुरक्षित राहावी, यासाठी हा निर्णय घेत असल्याचं सांगण्यात आलं आहे. या ५९ अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर मोबाईल अॅप्स आणि इंटरनेट वापरताना कोणती काळजी घ्यावी, डाऊनलोड करताना कुठली माहिती द्यावी याबाबत भारत सरकारनं निवेदन जारी केलं आहे. सरकारनं या ५९ अॅप्सची यादीसुद्धा जाहीर केली आहे. हे अॅप्स डाऊनलोड करू नये, असा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा- आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही ‘वर्क फ्राॅम होम’, ई-मेल, व्हाॅट्सअॅपवरून करता येईल काम

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा