नोटबंदीचं राजकारण

 Dalmia Estate
नोटबंदीचं राजकारण

मुलुंड - भाजपा नगरसेवक मनोज कोटक शनिवारी मेहुल टॉकीज जवळ सामान्यांना जुन्या नोटा बदलून सुटे पैसे देणार आहेत.' असा मॅसेज शुक्रवार पासून सोशल मीडियावर फिरत आहे. तसंच या मॅसेज खाली संदेश कोंडविलकर, सरचिटणीस मुंबई विभागीय काँग्रेस समिती असं नाव दिले आहे. या संदर्भात भाजपाचे मनोज कोटक यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. "या मॅसेज मध्ये कोणतेही तथ्य नसून नोटा बंद केल्यामुळे काळा पैसा असणाऱ्या काँग्रेसचं धाबे दणाणले आहे. त्यामुळे भाजपाचे नाव खराब करण्यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियाचा आधार घेतला जातोय. या संदर्भात पोलीस प्रशासन तसेच आयकर विभागाला देखील कळवले आहे" अशी माहिती मनोज कोटक यांनी दिली आहे. या संदर्भात काँग्रेसने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.

Loading Comments