Advertisement

शिवाजी महाराजांच्या जन्म तिथीवरून सभागृहात गदारोळ


शिवाजी महाराजांच्या जन्म तिथीवरून सभागृहात गदारोळ
SHARES

शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीवरून शुक्रवारी विधानसभेमध्ये चांगलाच गदारोळ झाला. या मुद्यावर विरोधकांसह सत्ताधारी देखील वेलमध्ये उतरले आणि त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली.


नेमकं घडलं तरी काय ?

इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी शिवाजी महाराजांची राज्यात दोनदा जयंती साजरी होते, महाराजांची जयंती एकाच दिवशी साजरी व्हावी असं सभागृहात म्हटलं. महाराजांचा जन्म ८ एप्रिल १६३० रोजी झाला, याला काही संशोधकांच्या संशोधनाचा आधार असल्याचंही हाळवणकर यांनी सांगितलं.


'म्हणणं रेकाॅर्डवरून काढा'

यावर सरकारने संशोधकांची एक समिती नेमून एकाच दिवशी महाराजांची जयंती साजरी करावी, असं सांगितलं. यावर महाराजांच्या जयंतीबाबत विसंगत बोलण्याचा अधिकार कुणालाही नाही अशी भूमिका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतली. सोबतच हाळवणकर यांचं म्हणणं रेकॉर्डवरून काढण्याची मागणी विरोधकांनी केली. मात्र सदस्याने केवळ माहिती दिली आहे, त्यात असंसदीय काहीही नसल्याचं सांगून अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विरोधकांची मागणी धुडकावून लावली.

त्यामुळे समाधान न झालेले विरोधक वेलमध्ये उतरले आणि त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. हे पाहता सत्ताधारी बाकावर बसलेले सदस्यदेखील वेलमध्ये उतरले.


अजित दादांचा पुढाकार

वाढलेला गोंधळ पाहत राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी पुढाकर घेत आधीच्या युती सरकार, आघाडी सरकारच्या काळातील अहवलाचा दाखला देत या मुद्द्यावर वाद निर्माण करता कामा नये, छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. यावर वावगं बोलणाऱ्याला राज्यात नीट जगता येणार नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका घ्यावी, पण राज्यात अनेक मोठे प्रश्न असताना उगाच वाद वाढवू नये, अशी भूमिका घेतल्याने सभागृह अखेर शांत झालं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा