Advertisement

देशात २१ दिवसाचा लॉकडाऊन - पंतप्रधान नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी म्हणाले की, रात्री 12 पासून सर्व देशात कर्फ्यू (लॉक डाऊन) लागू करण्यात आला आहे. पुढचे २१ दिवस कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही अशी घोषणाही त्यांनी केली.

देशात २१ दिवसाचा लॉकडाऊन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
SHARES

देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातल्या रुग्णांचा आकडा आज ५१९ वर पोहोचला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशवासियांना संबोधित केलं. या आधी गुरूवारी त्यांनी भाषण केलं होतं. त्यात त्यांनी देशवासियांना रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभर जनतेने कडकडीत बंद पाळला होता.


"२१ दिवसांचा लॉकडाऊन"

नरेंद्र मोदी म्हणाले की, रात्री 12 पासून सर्व देशात कर्फ्यू (लॉक डाऊन) लागू करण्यात आला आहे. पुढचे २१ दिवस कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही अशी घोषणाही त्यांनी केली. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे. तरच या भयंकर आजाराल आपण तोंड देऊ शकतो. त्यामुळे पुढचे २१ दिवस जिथे आहात तिथेच राहणंबंधनकारक आहे, असं मोदी यांनी स्पष्ट केलं.


"सोशल डिस्टंसिंगशिवाय पर्याय नाही"

कोरोनाशी लढायचं असेल तर सोशल डिस्टंसिंगशिवाय कुठलाही पर्याय नाही असं जगातले तज्ज्ञ सांगत आहेत. घरातच राहिल्याशिवाय कोरोनाचा प्रसार थांबत नाही. करोनाच्या संक्रमण सायकलला तोडलंच पाहिजे. घरात थांबणं हे फक्त रुग्णच नाही तर प्रत्येकासाठी गरजेचं आहे. तुमची एक चूक तुमच्या कुटुंबाला आणि देशालाही अडचणीत टाकू शकते.

असंच दुर्लक्ष होत राहिलं तर भारताला त्याची मोठी किंमत मोजावी लागले. त्याचा अंदाज करणंही शक्य नाही. सगळ्यांनी सरकारच्या सूचनांचं पालन करा असं आवाहनही त्यांनी केलं.


"जग कोरोनापुढे हतबल"

कोरोनाचं संकट पाहता अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. चीन, इटली, अमेरिका यांची वैद्यकीय सुविधा खूप चांगली आहे. पण या देशांमध्येही कोरोनानं हाहाकार माजवला आहे. पण या सर्व देशांनीच आपल्याला एक आशेचा किरण दाखवलाय. यावर एकच उपाय तो म्हणजे लॉकडाऊन. सोशल डिस्टसिंगशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून या सर्व देशांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. लॉकडाऊनमुळे काही देश कोरोनावर काही प्रमाणात मात करू शकले.   


"मानवता आणि देशावर संकट"

पंतप्रधान म्हणाले, २२ मार्चला देशवासियांनी जनता कर्फ्यूमध्ये आपलं योगदान दिलं. संकटाच्या या काळात सर्व एकत्र आले आणि जगाला दाखवून दिलं. मानवता आणि देशावर संकट आलं तर आम्ही सर्व भारतीय एकत्र येवून त्याचा सामना करतो हे जगाला दाखवून दिलं आहे. जगातल्या शक्तिशाली देशांनाही कोरोनानं गुडघे टेकायला लावलं आहे. या देशांजवळ सर्व साधनं असतानांही कोरोना वेगाने पसरत आहे.


कोरोनाचा अर्थ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा अर्थदेखील लोकांना समजवून सांगितला. यानुसार को - कोई, रो- रोड पे, ना - ना निकलो असा अर्थ त्यांनी समजवून सांगितला. 


देशात आकडा वाढतोय

देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातल्या रुग्णांचा आकडा आज ५१९ वर पोहोचला अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक १०७ तर केरळमध्ये ८७ जणांचा समावेश आहे. सख्या वाढत असल्याने जवळपास सरर्वच राज्यांनी लॉकडाउन केलं असून अनेक राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
हेही वाचा

संकट गंभीर; पण सरकार खंबीर - मुख्यमंत्री


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement