Advertisement

बांधकाम मजुरांना मिळणार २ हजारांची मदत, राज्य सरकारचा निर्णय

हातावर पोट असलेल्या बांधकाम मजुरांना प्रत्येकी २ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

बांधकाम मजुरांना मिळणार २ हजारांची मदत, राज्य सरकारचा निर्णय
SHARES

लाॅकडाऊनमुळे (lockdown) राज्यातील सर्व बांधकाम प्रकल्पांची (construction projects in maharashtra) कामं देखील ठप्प झाली आहेत. यामुळे विविध बांधकाम प्रकल्पावर काम करणाऱ्या बांधकाम मजुरांचे (Construction workers) चांगलेच हाल होत आहे. हाताला रोजगार देखील नाही. ही बाब लक्षात घेऊन हातावर पोट असलेल्या बांधकाम मजुरांना प्रत्येकी २ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे महाराष्ट्रातील बांधकाम मजुरांना आपल्या दैनंदिन मुलभूत गरजा भागवण्यासाठी थोडीफार मदत मिळू शकेल, असा विश्वासन राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील (labour minister dilip walse patil) यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - १० टक्के शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य

कोरोना व्हायरसचा (coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी देशभरात ३ मे पर्यंत लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील विविध ठिकाणची बांधकाम प्रकल्पांची कामे देखील ठप्प झाली आहेत. त्यामुळे कुणाच्याही हाताला काम नाही. खिशात पैसा नसल्याने हातावर पोट असणाऱ्या बांधकाम मजुरांचे मागील काही दिवसांमध्ये चांगलेच हाल झाले आहेत. बांधकाम मजुरांना भेडसावत असलेली समस्या लक्षात घेऊन त्यांना आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार घेण्यात आला आहे.

यानुसार बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंद असलेल्या सक्रीय बांधकाम कामगारांना २ हजार रुपये (2000 rupees grant) मिळणार आहे. हे आर्थिक सहाय्य बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात डीबीटी (DBT) पद्धतीने थेट जमा करण्यात येणार आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील १२ लाखांपेक्षा अधिक नोंदीत बांधकाम कामगारांना होणार असल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

इमारत व इतर बांधकामाची परवानगी देताना विकासकाकडून उपकर वसूल करून तो मंडळाकडे जमा करण्यात येतो. मंडळाकडे जमा उपकर निधीमधून नोंदीत बांधकाम कामगारांकरिता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गत ही आर्थिक मदत लाॅकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या बांधकाम मजुरांना देण्यात येणार आहे. या आर्थिक मदतीमुळे बांधकाम मजुरांना थोडाफार दिलासा निश्चित मिळणार आहे.

हेही वाचा - गुड न्यूज! सोमवारपासून राज्यात ‘हे’ व्यवसाय सुरू होणार, मार्गदर्शक आदेश जारी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा