Advertisement

कल्याण-डोंबिवलीतही पुणे पॅटर्न राबवा, मनसेचे आमदार राजू पाटील यांची मागणी

केडीएमसी परिसर कोरोनामुक्त करण्यासाठी केडीएमसी क्षेत्रात पुणे पॅटर्न राबवा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील (mns mla raju patil) यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

कल्याण-डोंबिवलीतही पुणे पॅटर्न राबवा, मनसेचे आमदार राजू पाटील यांची मागणी
SHARES

कल्याण-डोंबिवली परिसर (kdmc) हा कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनत चालल्याने या परिसरातील रहिवासी धास्तावले आहेत. कोरोना रूग्ण संख्येत तर डोंबिवली चौथ्या क्रमांकावर जाऊन पोहोचली आहे. लाॅकडाऊनलाही (lockdown) मर्यादा असल्याने परिसर कोरोनामुक्त करण्यासाठी केडीएमसी क्षेत्रात पुणे पॅटर्न राबवा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील (mns mla raju patil) यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

काय म्हटले पाटील?

मनसे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारला यासंदर्भात एक पत्र पाठवलं आहे. यांत त्यांनी म्हटलं आहे की, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णसंख्या (corona patient) सातत्याने वाढत आहे. येथील रुग्णसंख्या १३७ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. विविध उपाययोजना करूनही शहरात ठिकठिकाणी कोरोना हाॅटस्पाॅट (corona hotspot) बनत चालले आहेत. डोंबिवली कोरोना रुग्णांच्या संख्येत चौथ्या क्रमांकावर गेल्याने रहिवासी धास्तावले आहेत. लाॅकडाऊन करण्यातलाही मर्यादा आहेत. तर कोरोनावर उपाययोजना करत असलेले अधिकारीही हतबल झाले आहेत.

हेही वाचा- Coronavirus Updates: कोरोनाच्या तपासणीसाठी कल्याण-डोंबिवलीत स्वतंत्र वैद्यकीय प्रयोगशाळा

पुण्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी महापालिका क्षेत्रात सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या जोडीला ४ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. हे अधिकारी त्यांची मूळ जबाबदारी सांभाळून संबंधित परिसर कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. हा अत्यंत चांगला निर्णय आहे. याच पद्धतीने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातही आणखी काही अधिकाऱ्यांची नियुक्त करावी, अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा- परदेशी नागरिक असलेल्या 10 तबलिगींना मुंबईत अटक


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा