शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

 Dahisar
शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

दहिसर - येथील केतकीपाडा परिसरातील वॉर्ड क्रमांक 3 मध्ये गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देणाऱ्या शिवसेनेच्या बॅनरवरून चक्क नगरसेवकाचा फोटो गायब झाल्याचे पहायला मिळत आहे. दहिसर पूर्व येथील केतकीपाडा परिसरात शिवसनेच्यावतीने बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरमध्ये शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांचे फोटो लावण्यात आले. मात्र शिवसेना नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांचा फोटो गायब करण्यात आला. त्यामुळे शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. याबाबत नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Loading Comments