SHARE

मुंबई - शिवसेना- भाजपाची युती तुटल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर मुंबईच्या डबेवाल्यांनी शिवसेनेच्या पाठिशी रहाण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त निर्णयच घेतला नाही तर डबेवाले शिवसेनेचा प्रचारही करणार आहेत, अशी माहिती मुंबई डबेवाला असोशिएशनचे प्रवक्ता सुभाष तळेकर यांनी दिली. तसंच 100 टक्के मराठी माणसांची संघटना यात एकही परप्रांतीय नाही. मुंबईवरही मराठी माणसाचं प्रभुत्व असावं असं डबेवाल्यांना वाटत असल्याचं तळेकर यांनी या वेळी स्पष्ट केलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या