मराठा बाईक रॅलीत डबेवाल्यांचाही सहभाग

  Mumbai
  मराठा बाईक रॅलीत डबेवाल्यांचाही सहभाग
  मुंबई  -  

  मुंबई - येत्या 6 नोव्हेंबरला होणाऱ्या मराठा क्रांती मुक मोर्चा बाईक रॅलीत डबेवालेही सहभागी होणार आहेत. डबेवाल्यांकडे अधिकतर सायकली असल्याकारणानं खासदार शिवाजीराव आढळराव यांनी काही डबेवाल्यांना बाईक घेऊन दिल्या. त्यांच्या भैरवनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी बाईक घेऊन दिल्या. डबेवाले संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब करवंदे, बबनदादा वाळंज, विठ्ठल सावंत, अशोक कुंभार, अर्जुन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली डबेवाले बाईक रॅलीत सहभागी होणार आहेत. 'मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहीजे ही डबेवाल्यांची मागणी आहे. जर आरक्षण मिळालं तर आमच्या मुलांना त्याचा उपयोग शिक्षण आणि नोकरीसाठी होईल' असं डबेवाल्यांचे प्रवक्ता सुभाष तळेकर म्हणालेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.