Advertisement

मंत्रालयासमोर पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्रालयासमोर एका शेतकऱ्याने आत्महदहनाचा प्रयत्न केला होता.

मंत्रालयासमोर पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
SHARES

पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्रालयासमोर एका शेतकऱ्याने आत्महदहनाचा प्रयत्न केला होता. जखमी अवस्थेत या शेतकऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र आज उपचारादरम्यान, या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

सुभाष भानुदास देशमुख असं या शेतकऱ्याचे नाव आहे. सुभाष देशमुख हे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील तांदूळवाडी गावचे रहिवासी होते. 23 ऑगस्ट रोजी दुपारी मंत्रालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून देशमुख यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

पण त्याचवेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेतली आणि त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली. या घटनेमध्ये देशमुख हे जखमी झाले होते. त्यांना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर जे.जे. रूग्णालय येथे उपचार सुरू होते.

आज 29 ऑगस्ट रोजी उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉक्टर सागर गुंडेवाल यांनी त्यांना 11:55 वाजता मयत घोषित केले.

23 ऑगस्ट रोजी बजाज भवन जवळ फुटपाथवरील झाडाखाली आडोशाला उषा मेहता चौक या ठिकाणी सुभाष देशमुख यांनी त्यांच्या गावाकडील जमीन हडपली असल्याच्या कारणावरून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता.

त्या ठिकाणी गस्तीवर असलेले पोलिसांनी आणि विशेष शाखा, फायर किट टीम मधील आंगणे यानी तत्काळ आग विझून त्यांना मरीन ड्राइव्ह पोलीस ठाणे मदतीने GT Hospital याठिकाणी उपचाराकरिता नेण्यात आले होते. जमिनीच्या वादातून सुभाष देशमुख यांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते.



हेही वाचा

शिवसेनेचा दसरा मेळावा शिंदे गट हायजॅक करणार? पालिकेकडून निर्णय होल्डवर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा