Advertisement

राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराकडे सरकारचं दुर्लक्ष- देवेंद्र फडणवीस

कोविड आणि विलगीकरण केंद्रात महिला सुरक्षेसाठी तातडीने ‘एसओपी’ बनवावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराकडे सरकारचं दुर्लक्ष- देवेंद्र फडणवीस
SHARES

राज्यातील कोविड सेंटर्स आणि इतर ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी करायच्या उपाययोजनांकडे राज्य सरकारचं पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने बघून कोविड आणि विलगीकरण केंद्रात महिला सुरक्षेसाठी तातडीने ‘एसओपी’ बनवावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. (devendra fadnavis demands to maharashtra government must make SOP for quarantine and covid centers to stop atrocities against women)

राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत असताना अन्य विषयांवर हिरीरीने बोलणारे, दिवसातून तीन वेळा टिव्हीवर येणारे चेहरे या विषयांवर साधा निषेध करतानासुद्धा दिसून येत नाही, हे आजचं वास्तव आहे. हा असंवेदनशीलतेचा कळस आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.

राज्यात फेब्रुवारी २०२० मध्ये महिला/युवतींना जाळून मारण्याच्या किमान ७ घटना घडल्या होत्या. हिंगणघाट, सिल्लोड, पनवेल, मिरा रोड, लातूर, नागपूर, लासलगावात या घटना घडल्या होत्या. पुढे दिशा कायद्याची चर्चा माध्यमांमध्ये घडविली गेली आणि कालांतराने तो प्रस्ताव थंड बस्त्यात टाकला गेला. पनवेल क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्कार, सिंहगड क्वारंटाईन सेंटरमध्ये सुरक्षा रक्षकाकडून विनयभंग, पुण्यातील सह्याद्री हाॅस्पीटलमध्ये वाॅर्डबाॅयकडून विनयभंग, चंद्रपूरच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये युवतीचा विनयभंग, मालाड येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये विनयभंग, मिरा-भाईंदरमधील कोविड सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार, मानखुर्द येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग, बडनेरा इथं शासकीय लॅबमध्ये महिलेच्या गुप्तांगाचा स्वॅब घेणे, अशा अनेक घटना घडल्या आहेत. ज्या पहिल्या पत्रात नमूद केल्या आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा - Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रश्नी विरोधकही सरकारच्या पाठिशी, म्हणाले...

या घटना पाहता ग्रामीण भागात आणखी किती महिलांना कशा कशा जाचाला सामोरं जावं लागलं असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. यामुळे राज्यातील कोविड आणि क्वारंटाईन सेंटरसाठी एसओपी तयार कराव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. पण त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. कोणतीही घटना झाली, तरी आरोपीला अटक करून चालणार नाही. तर संबंधित दोषी अधिकाऱ्यांवरसुद्धा कारवाई करायला हवी होती. परंतु तसं कुठल्याही घटनेत दिसून येत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं. 

त्यामुळे राज्यात तशाच घटना सर्वत्र दिसून येत आहेत. मंठा-जालना, मौजे करंजविहिरे-पुणे, नांदुरा-बुलढाणा, तांबडी-रोहा, पाबळ-पुणे, कराड, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, रत्नागिरी, धारावी, मानखुर्द, मुंबई, अशा ठिकाणी महिला/युवती, अल्पवयीन मुलीचा विनयभंग, बलात्कार, हत्या अशा घटना घडल्या आहेत. या वाढणाऱ्या घटनांकडे पाहता स्थानिक पातळीवर प्रशासन संवेदनशील असलं पाहिजे, आवश्यक त्या उपाययोजना केल्या पाहिजेत, अश अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.  

Read this story in English
संबंधित विषय
POLL

कोलकाता विरुद्धचा सामना जिंकून मुंबई इंडियन्स मिळवेल का पहिला विजय ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा