Advertisement

देवेंद्र फडणवीस यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात हक्कभंग

देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत केला होता. त्यानंतर मोठा गदारोळ झाला.

देवेंद्र फडणवीस यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात हक्कभंग
SHARES

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत केला होता. त्यानंतर मोठा गदारोळ झाला. 

तसंच मराठा आरक्षणावरून दिशाभूल करण्याचा आरोप करत काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात देखील देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंगाची नोटीस दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, अन्वय नाईक यांची हत्या झाली नसून आत्महत्या आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना आत्महत्येस प्रवृत्त केलं नसल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबले असे म्हणणे चुकीचे आहे. मी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सभागृहात देखील सांगितला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असताना देखील न्यायालयाचा अवमान करणारं वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. 

अनिल देशमुख यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे असून ते त्यांनी जाणूनबुजून केले आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. अन्वय नाईक यांच्याबद्दल केलेलं विधान अनिल देशमुख यांनी एकदा केले नसून त्यांची पुनरावृत्ती केली. सदर वक्तव्य करून त्यांनी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. मला जे स्वातंत्र्य मिळाले आहे त्याचा भंग त्यांनी केला आहे. हे प्रकरण विशेष हक्कभंग समितीकडे पाठवावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा