Advertisement

देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या भेटीला, राजकीय चर्चांना ऊत

देवेंद्र फडणवीस हे सध्या जळगावच्या दौऱ्यावर आहेत. मुक्ताईनगरमधून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे.

देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या भेटीला, राजकीय चर्चांना ऊत
SHARES

राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतली होती. आता त्यानंतर मंगळवारी ते थेट ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या भेटीला गेले आहेत. या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. 

देवेंद्र फडणवीस हे सध्या जळगावच्या दौऱ्यावर आहेत. मुक्ताईनगरमधून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप (BJP) सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे प्रथमच खडसेंच्या मतदारसंघात आहेत.  एकनाथ खडसे यांच्या कोथळी येथील घरी त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे फडणवीसांच्या या भेटीमुळं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

जळगाव (jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने थैमान घातलं होतं. यात केळी बागांसह घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. दौऱ्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे खडसेंच्या घरी सदिच्छा भेट दिली. या ठिकाणी त्यांनी एकनाथ खडसेंच्या सून आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फडणवीस हे पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर गेले होते. 



हेही वाचा - 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी महापालिका सज्ज

  1. मुंबई, ठाण्यातील सर्व दुकानं खुली
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा