Advertisement

गोव्यातील विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचे मुंबईत भाजपकडून जंगी सत्कार

गोव्यातील भाजपच्या दणदणीत विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत जंगी स्वागत केलं जात आहे. दक्षिण मुंबईत असलेल्या भाजपाच्या प्रदेश कार्यालयाजवळ मोठ्या जल्लोषात दवेद्र फडणवीस यांचे स्वागत केलं जाणार आहे.

गोव्यातील विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचे मुंबईत भाजपकडून जंगी सत्कार
SHARES

गोव्यातील भाजपच्या दणदणीत विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत जंगी स्वागत केलं जाणार आहे. दक्षिण मुंबईत असलेल्या भाजपाच्या प्रदेश कार्यालयाजवळ मोठ्या जल्लोषात दवेद्र फडणवीस यांचे स्वागत केलं जाणार आहे. गोव्यातील विजयानंतर सध्यस्थितीत भाजपाच्या या प्रदेश कार्यालयाजवळ ढोल-ताशांचा गजरात इतर भाजपनेते विजय साजरा करत आहेत. याठिकाणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नेते आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांसह अनेक नेते उपस्थित आहेत.

थोड्याच वेळात या भाजपाच्या मुख्यालय इथं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत होणार असूनभाजप नेत्यांकडून त्यांचा सत्कार केला जाणार आहेराज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी होते.

गोव्यातील भाजपच्या दणदणीत विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचे पक्षातील वजन आणि पत आणखीनच वाढली आहेदरम्यान, सध्या मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच हवा आहेदेवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या सागर बंगल्याच्या परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून मोठ्याप्रमाणावर बॅनर्स लावण्यात आले आहेतया बॅनर्सवर देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केलाअशा संदेशांपासून ते शुभेच्छा देणारा मजकूर पाहायला मिळत आहे.

एक्झिट पोल्सनी गोव्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्त्वात येईलअसा अंदाज वर्तविला होतायाठिकाणी बहुमतासाठी २२ जागांची गरज होतीमात्र,काँग्रेस आणि भाजपपैकी कोणालाच बहुमत मिळणार नाहीअसे अंदाज होतेपरंतुदेवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलेली उमेदवारांची निवडअचूक व्यवस्थापन आणि प्रचारामुळे भाजपने हे सगळे अंदाज मोडीत काढत गोव्यात २० जागा जिंकल्या. 

त्यानंतर अपक्ष उमेदवारांनीही भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊ केलात्यामुळे गोव्यात भाजप सहजपणे सत्ता स्थापन करेलहे आता स्पष्ट झाले आहेयापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी बिहार विधानसभा निवडणुकीतही आपल्या राजकीय कौशल्याची चुणूक दाखवली होतीत्याठिकाणीही भाजपने तेजस्वी यादव यांचे आव्हान परतवून लावत मोठे यश मिळवले होतेया सगळ्यात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची होतीत्यामुळे साहजिकच देवेंद्र फडणवीस यांचे पक्षातील राजकीय वजन वाढले आहे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा