'हफ्ता वसूली करणाऱ्यांनाच तिजोरीच्या चाव्या?'

 Mumbai
'हफ्ता वसूली करणाऱ्यांनाच तिजोरीच्या चाव्या?'
Mumbai  -  

मुंबई - मुंबईत शिवसेनेचा महापौर बनणार यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र त्यात भाजपानं ऐनवेळी महापौर, उपमहापौर आणि समिती अध्यक्षपदाच्या शर्यतीतून घेतलेली माघार हा चर्चेचा विषय ठरला आहे. निवडणुकीआधी शिवसेनेवर तुटून पडलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक शिवसेनेला मदत करणारी भूमिका घेतल्यामुळे सामान्यांप्रमाणेच राजकीय वर्तुळातून भाजपाच्या भूमिकेवर संशय घेतला जात असून खरपूस टीकाही केली जात आहे. यामध्ये आघाडीवर आहेत राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे. शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांवर त्यांनी कडाडून टीका केली आहे. यासाठी निवडणुकीपूर्वी वर्तमानपत्रात छापून आलेल्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या वक्तव्यांचा संदर्भ धनंजय मुंडेंनी घेतलाय.


  • शिवसेनेला औकात दाखवण्याची भाषा करणाऱ्या मुख्यंमत्र्यांनी हफ्ता वसुली करणाऱ्यांच्याच हातात मुंबईच्या तिजोरीच्या चाव्या कशा दिल्या? असा प्रश्न मुंडेंनी ट्विटरवर केलाय.


  • तर शिवसेनेचे कपडे उतरवायला निघालेल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांनाच राजवस्त्र दिली असाही टोला मुंडेंनी लगावलाय.


  • फक्त मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य करून मुंडे थांबले नाहीत. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधलाय. निवडणुकीपू्र्वी 'हे बळी घेणाऱ्यांचे राज्य' म्हणणाऱ्या शिवसेनेची आता भूमिका काय आहे असा सवाल त्यांनी शिवसेनेला केलाय.


  • तर हे गुंडांचे मंत्री अशी टीका मुख्यंमत्र्यांवर करणाऱ्या उद्धव ठाकरेंना 'डू यू रिमेंबर' असा ट्विटर टॅग करून त्यांनी प्रश्न विचारलाय. 'डू यू नो' अशा टॅगलाईनखाली शिवसेनेनं यंदा महापालिका निवडणुकीत प्रचार केला होता.
Loading Comments