कुर्ल्यात डॉक्टर vs डॉक्टर

Mumbai  -  

कुर्ला - मुंबई महापालिका निवडणुकीत अनेक चुरशीच्या लढती होत आहेत. यात एक लक्षवेधी लढत कुर्ल्याच्या वॉर्ड क्रमांक 168 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचं कारण आहे शिवसेनेच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरलेल्या विद्यमान नगरसेविका डॉक्टर अनुराधा पेडणेकर यांना आव्हान दिलंय ते पेशाने डॉक्टर असलेल्या सईदा खान यांनी. त्यामुळे डॉक्टर विरूद्ध डॉक्टर अशी लढत इथे होणार आहे. होमिओपॅथी डॉक्टर असलेल्या अनुराधा पेडणेकर या चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची बहिण भूलतज्ञ डॉक्टर सईदा खान या राष्ट्रवादीकडून मैदानात उतरल्या आहेत. दोघीही आपणच निवडून येण्याचा दावा करतायत. गेल्या 5 वर्षात या दोघींनीही समाजकार्यातून परिसरात चांगली छाप पाडलीय. त्यामुळे दोघींचीही प्रतिष्ठा पणाला लागलीय. पण, रुग्णांवर उपचार करणाऱ्या या दोन डॉक्टरांना कोण तारणार हे जनताच ठरवेल.

Loading Comments