Advertisement

मराठा समाजाला भडकवणारी वक्तव्य करू नका- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मराठा आरक्षण हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये कोणीही भडक वक्तव्ये करून समाजामध्ये विद्वेष निर्माण करू नये, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.

मराठा समाजाला भडकवणारी वक्तव्य करू नका- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
SHARES

मराठा आरक्षण हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये कोणीही भडक वक्तव्ये करून समाजामध्ये विद्वेष निर्माण करू नये, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.

यासंदर्भात पोलीस यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असून, पोलीस त्यामध्ये व्यस्त आहेत. त्यांचा ताण वाढेल, असं कृत्य करणं योग्य ठरणार नाही. आरक्षणाच्या संदर्भात भावना कितीही तीव्र असल्या तरी रस्त्यावर उतरून अशांतता निर्माण करू नये, असं आवाहन करून उपसमितीचे सदस्य आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी हा विषय चर्चा करून कायदेशीर मार्गाने सोडवता येईल, असं सांगितलं.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

हेही वाचा- मराठा उमेदवारांसाठी सर्व जिल्ह्यांत 'विशेष कार्य अधिकारी' नेमणार

मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध 

मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल धक्कादायक व अनपेक्षित आहे. मराठा समाजाच्या हितासाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी एकमताने हा कायदा पारीत केला होता. अजूनही राज्य सरकार यासंदर्भात सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या विषयावर कोणीही राजकारण न करता एकदिलाने काम करावं. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं उपसमितीचे सदस्य आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी याप्रसंगी सांगितलं.

या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, विशेष विधीज्ञ अॅड. विजयसिंह थोरात, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, विधी व न्याय विभागाचे सचिव भुपेंद्र गुरव, उपसचिव संजय देशमुख, राज्य शासनाचे वकील अॅड. अक्षय शिंदे, अॅड. वैभव सुगदरे, राज्य शासनाने नेमलेल्या मराठा समाजातील खासगी वकिलांच्या समन्वय समितीचे सदस्य अॅड. आशिषराजे गायकवाड, अॅड. अभिजीत पाटील आदी यावेळी उपस्थित होते. मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य तथा मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार दूरदृश्य प्रणाली  (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) च्या माध्यमातून सहभागी झाले होते.

(don't do aggressive statement about maratha reservation says maharashtra home minister dilip walse patil)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा