Advertisement

३७० कलमप्रमाणेच मराठा आरक्षणासाठी हिंमत दाखवा - मुख्यमंत्री

मराठा आरक्षण कायद्यावरून लागलेल्या निकालावरून उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातील मराठा समाजाला न्याय मिळण्याकरता आपण पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे साकडे घालणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

३७० कलमप्रमाणेच मराठा आरक्षणासाठी हिंमत दाखवा - मुख्यमंत्री
SHARES

सर्वोच्च न्यायालयाने  मराठा आरक्षणाच्या कायदाप्रश्नी निकाल दिला. त्यांच्या निकालाचा आदरच आहे, मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने निराशा झाली असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ज्याप्रमाणे एका रात्रीत ३७० कलम कायद्यावरून केंद्र सरकारने हिंमत दाखवली तशीच हिंमत मराठा आरक्षणासाठीही केंद्र सरकारने दाखवावी अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

मराठा आरक्षण कायद्यावरून लागलेल्या निकालावरून उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातील मराठा समाजाला न्याय मिळण्याकरता आपण पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे साकडे  घालणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गुरूवारी यासंदर्भात ते पंतप्रधानांना पत्र लिहिणार असून वैयक्तिक भेट घेण्याची गरज असल्यास तेही करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

उद्धव म्हणाले की, निकालपत्राचा अभ्यास सुरू आहे. पण एकमताने घेतलेल्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. कुणीतरी म्हटलं की आम्ही उच्च न्यायालयात जिंकलो, ते सर्वोच्च न्यायालयात तुम्ही हरलात तुम्हाला बाजू मांडता आली नाही. पण तसं झालेलं नाही. ज्या वकिलांनी आपल्याला उच्च न्यायालयात यशस्वीपणे बाजू मांडली, त्याच वकिलांमध्ये कोणतेही बदल न करता त्यांना अधिक वकिलांची मदत देत सर्वांना सोबत घेत आपण लढलो. पदरी निराशा आली आहे. पण निराश झाला तो महाराष्ट्र कसला?

 मराठा समाजासोबतच संपूर्ण महाराष्ट्र निराश झाला आहे. मात्र, या निकालानंतरही या मराठा समाजातील बांधवांनी आणि नेत्यांनी संयम बाळगला त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो असंही उद्धव ठाकरे म्हणाले.  समाजविघातक शक्ती आग लावण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्या चिथावणीला बळी पडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला केले.

सर्वोच्च न्यायालयाने आता कायदा तर रद्द केला आहे. त्यामुळे पुढे काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेच पुढील मार्ग दाखवला असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. याबाबत कायदा बनवण्याचा पूर्णत: अधिकार पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना आहे. त्यामुळे त्यांनी आता या प्रश्नी लक्ष घालून महाराष्ट्रातील मराठा बांधवांना न्याय द्यावा असं उद्धव ठाकरे म्हणाले.



हेही वाचा

  1. एक प्रकारे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला मार्गदर्शनच- उद्धव ठाकरे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा