Advertisement

इंदू मिल स्मारकाला अजून 3 वर्ष लागणार!

स्मारकाच्या बांधकामास होत असलेला विलंब, दुर्लक्ष, जनतेमध्ये निर्माण झालेली असंतोषाची भावना याकडे विधानपरिषद सभागृहात विरोधकांकडून लक्ष वेधले गेले. त्यावर सरकार स्मारकाच्या बाबतीत सकारात्मक असून पुढील 3 वर्षांत स्मारकाचे बांधकाम पूर्ण होईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यानी दिलं.

इंदू मिल स्मारकाला अजून 3 वर्ष लागणार!
SHARES

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याचा निर्णय शासनाने घोषित केला. मात्र, अद्याप त्याची एक वीटही रचली गेली नसल्याने स्मारकाच्या बांधकामाचा अंदाजित खर्च वाढला आहे. त्यामुळे स्मारकाच्या बांधकामास होत असलेला विलंब, दुर्लक्ष, जनतेमध्ये निर्माण झालेली असंतोषाची भावना याकडे विधानपरिषद सभागृहात विरोधकांकडून लक्ष वेधले गेले. त्यावर सरकार स्मारकाच्या बाबतीत सकारात्मक असून पुढील 3 वर्षांत स्मारकाचे बांधकाम पूर्ण होईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यानी दिलं.


वेळकाढूपणामुळे स्मारकाचा खर्च वाढला

बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यासाठी इंदू मिलच्या जागेचं 11 ऑक्टोबर 2015 रोजी भूमिपूजन करून ती जागा एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात आली. मात्र, त्यावेळी त्या स्मारकाचा अंदाजित खर्च सुमारे 425 कोटी होता. आज हा खर्च वाढून 623 कोटी रुपयांवर गेल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसंच, या स्मारकाला अजून किती कालावधी लागणार आहे? असा प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आला.


काम तीन वर्षांत पूर्ण होणार

यावेळी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक येत्या ३ वर्षांत पूर्ण होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यात महत्वाचे टप्पे आणि त्यांचे काम २ वर्षांत आणि त्यानंतर उर्वरीत टप्पा हा पुढील वर्षभरात पूर्ण होईल, अशी त्यांनी माहिती दिली.


'..तर स्मारकाला ७०००कोटी देऊ'

सरदार पटेलांचे ही स्मारक उभारण्यात येणार असून त्यांच्या स्मरकापेक्षा कमी खर्च बाबासाहेबांच्या स्मारकावर का? असा सवाल प्रकाश गजभिये यांनी उपस्थित केला. यावर हे स्मारक सागरी किनाऱ्यावर उभे राहणार असले तरी, त्यासाठी ७००० कोटी रुपयेही सरकार उपलब्ध करून देईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईवरून सीलिंककडे येणाऱ्या व मुंबईला येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला स्मारकाचे दर्शन होईल, अशा पद्धतीने स्मारक उभे करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.



हेही वाचा

आंबेडकर स्मारक रखडलं; निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने पुनर्निविदा


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा