Advertisement

सिनेमानंतर आता मोदींची वेब सिरिजही ‘ऑफलाईन’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर अधारित असलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या सिनेमाच्या प्रदर्शनाला निवडणूक आयोगानं काही दिवसांपूर्वीच स्थगिती दिली होती. त्यानंतर आता इरॉस नाऊच्या ‘मोदी- जर्नी ऑफ अ कॉमन मॅन’ या वेब सीरिजचं ऑनलाइन प्रक्षेपण थांबवण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत.

सिनेमानंतर आता मोदींची वेब सिरिजही ‘ऑफलाईन’
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर अधारित असलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या सिनेमाच्या प्रदर्शनाला निवडणूक आयोगानं काही दिवसांपूर्वीच स्थगिती दिली होती. त्यानंतर आता इरॉस नाऊच्या ‘मोदी- जर्नी ऑफ अ कॉमन मॅन’ या वेब सीरिजचं ऑनलाइन प्रक्षेपण थांबवण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत.

पुढील आदेशापर्यंत स्थगिती

इरॉस नाऊ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘मोदी- जर्नी ऑफ अ कॉमन मॅन’ ही वेब सीरीज ३ एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात आली होती. या सीरीजचे १० पैकी ५ भाग प्रदर्शित करण्यात आले आहेत. मात्र आता पुढील आदेश मिळेपर्यंत या सीरीजच्या सर्व भागांचं प्रक्षेपण थांबवण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून निवडणुकीच्या कालावधीत एखाद्या राजकीय नेत्याच्या आयुष्यावर असा सिनेमा वा वेब सिरिज प्रदर्शित होऊ नये, असं निरीक्षण निवडणूक आयोगानं नोंदवलं आहे.

'यांची' भूमिका

या वेब सीरीजमध्ये फैजल खान, आशिष शर्मा आणि महेश ठाकूर यांनी मोदींच्या निरनिराळ्या वयातील छटा आपल्या भूमिकेतून साकारल्या आहेत. यातून त्यांचा सामान्य व्यक्तीपासून पंतप्रधान बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

हेही वाचा -

'राज ठाकरेंच्या सभा म्हणजे निव्वळ टाईमपास'- विनोद तावडे

'चुनाव का महिना, राफेल करे शोर...' आव्हाडांची गाण्यातून नरेंद्र मोदींवर टीका

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा