Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,72,781
Recovered:
57,19,457
Deaths:
1,17,961
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,809
733
Maharashtra
1,32,241
9,361

'चुनाव का महिना, राफेल करे शोर...' आव्हाडांची गाण्यातून नरेंद्र मोदींवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. एका गाण्याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.

'चुनाव का महिना, राफेल करे शोर...' आव्हाडांची गाण्यातून नरेंद्र मोदींवर टीका
SHARES

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय उमेदवार एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळत आहे. अशातचं आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. एका गाण्याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. 


चुनाव का महिना

जितेंद्र आव्हाड यांनी 'सावन का महिना पवन करे सोर' या हिंदी चित्रपटताली या गाण्यावरून एक रिमेक बनवला आहे. 'चुनाव का महिना, राफेल करे सोर... पुरी दुनिया बोले, है चौकीदार चोर...' असे या गाण्याचे बोल आहेत. तसंच, हे गाणं आव्हाड यांनी स्वत: हातात गिटार घेऊन गायलं असून या गाण्याचा व्हिडीओ त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केला आहे. तसंच, त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. नरेंद्र मोदींवर टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे प्रचारसभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांना लक्ष्य करत आहेत. तसंच, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेतेही वेगवेगळ्या माध्यमांतून मोदींवर टीका करताना पाहायला मिळत आहे.हेही वाचा -

माझ्या शापानेच करकरेंचा मृत्यू, साध्वी प्रज्ञा यांचं वादग्रस्त वक्तव्य

काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेतसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा