Advertisement

काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी राजीनामा देत अचानकपणे शिवसेनेत प्रवेश केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडं राजीनामा पाठवल्यानंतर हा निर्णय त्यांनी घेतला.

काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत
SHARES

लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी राजीनामा देत अचानकपणे शिवसेनेत प्रवेश केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडं राजीनामा पाठवल्यानंतर हा निर्णय त्यांनी घेतला.  


गुंडांना पक्षात प्राधान्य

प्रियंका चतुर्वेदी यांनी काही दिवसांपूर्वी महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या गुंडांना पक्षात प्राधान्य दिलं जात असल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली होती. तसंच, याबाबत त्यांनी एक ट्विट देखील केलं. यामध्ये प्रियांका यांनी काँग्रेसला देखील टॅग केलं होतं. 

प्रियांका यांनी 'मी पक्षासाठी टीकेचा सामना केला, दगड झेलले. मात्र, तरीही उलट पक्षाच्या नेत्यांनीच मला धमक्या दिल्या. जे लोक धमक्या देत होते, ते वाचले. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे', अशा शब्दांमध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली असून, याबाबत एक पत्रदेखील त्यांनी रिट्विट केलं होतं. कारवाई मागे

रिट्विट केलेल्या पत्रामध्ये त्यांच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्यांविरोधातील कारवाई मागे घेतल्याचा उल्लेख होता. 'प्रियांका चतुर्वेदी ज्यावेळी राफेल डीलबद्दल पत्रकार परिषद घेण्यास आल्या होत्या, त्यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं होतं. या कार्यकर्त्यांविरोधात शिस्तभंग केल्याबद्दल कारवाई करण्यात आली होती. मात्र, संबंधितांची पुन्हा त्यांच्या पदांवर वर्णी लावण्यात येत आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागाचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या शिफारशीनंतर ही कारवाई मागे घेण्यात येत आहे', असा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला होता.


शिवसेनेत प्रवेश

काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत प्रवेश करणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.  


कोण आहेत चतुर्वेदी ?

मे २०१३ मध्ये प्रियांका चतुर्वेदी यांची काँग्रेस प्रवक्त्या म्हणून निवड झाली होती. सोशल मीडिया, वृत्तवाहिन्यांवर काँग्रेस पक्षाची बाजू मांडण्यात प्रियांका या अग्रेसर होत्या. प्रियांका यांनी डीएनए, तेहलका, फर्स्टपोस्ट यासारख्या वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केलं आहे. बाल शिक्षण, महिला सबलीकरण आणि आरोग्य यासारख्या विषयांवर त्या कार्यरत आहेत. पुस्तकांची समीक्षा करणारा चतुर्वेदींचा ब्लॉग हा देशभरातील टॉप टेन वेबब्लॉग्जपैकी एक मानला जातो. त्याशिवाय, रणदीप सुरजेवालांच्या नेतृत्वातील 'कम्युनिकेशन विभागा'च्या त्या सदस्या आहेत. हेही वाचा -

'शब-ए-बारात'साठी बेस्ट, पश्चिम रेल्वेची विशेष सेवा

देवराच दक्षिण मुंबईचे योग्य प्रतिनिधी, मुकेश अंबानींनी दिला पाठिंबाRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा