देवराच दक्षिण मुंबईचे योग्य प्रतिनिधी, मुकेश अंबानींनी दिला पाठिंबा

दक्षिण मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार मिलंद देवरा यांना उद्योगपती मुकेश अंबानी व बँकर उदय कोटक या दोघांनीही पाठिंबा दिला आहे. देवरा यांनी या पाठिंब्याचा एक व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी आणि उदय कोटक देवरा यांचं समर्थन करीत असल्याचं दिसत आहे.

SHARE

दक्षिण मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार मिलंद देवरा यांना उद्योगपती मुकेश अंबानी व बँकर उदय कोटक या दोघांनीही पाठिंबा दिला आहे. देवरा यांनी या पाठिंब्याचा एक व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी आणि उदय कोटक देवरा यांचं समर्थन करीत असल्याचं दिसत आहे. अंबानी यांच्यासह काही लहान व्यापाऱ्यांनीही देवरा यांचं समर्थन केलं आहे. 

योग्य प्रतिनिधी

मिलिंद देवरा यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये 'मिलिंद देवरा हेच दक्षिण मुंबईसाठी योग्य प्रतिनिधी आहेत. त्यांनी दक्षिण मुंबईचे १० वर्षे प्रतिनिधित्व केलं आहे. मला विश्वास आहे की, मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबईची सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जाण आहे', असं मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे. तसंच, 'मिलिंद देवरा हे खऱ्या अर्थाने मुंबई कनेक्शनचं प्रतिनिधित्व करतील', असं उदय कोटक यांनी म्हटलं आहे. 


राजकीय वर्तुळात चर्चा

मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांना राफेल करारावरून काँग्रेसने घेरलं आहे. अशातच, काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना मुकेश अंबानी यांनी समर्थन केल्यानं राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.हेही वाचा -

बीडीडी चाळीतील नागरिकांची अरविंद सावंत यांच्या रॅलीविरोधात नाराजीसंबंधित विषय
ताज्या बातम्या