बीडीडी चाळीतील रहिवाशांकडून अरविंद सावंत यांचा निषेध

मुंबईत गेली अनेक वर्ष बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न रखडला आहे. त्यामुळं बीडीडी चाळीतील रहिवाशांनी शिवसेना-भाजपा महायुतीकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या प्रचार रॅलीविरोधात नाराजी व्यक्त करत जागोजागी निषेधाचे फलक लावले आहेत.

SHARE

रॅलीच्या विरोधात नाराजी

लोकससभा निवडणुकीसाठी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजपा महायुतीकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुरूवारी डिलाईल रोडवर अरविंद सावंत यांची प्रचार रॅली काढण्यात आली होती. मात्र, याच मतदारसंघात बीडीडी चाळींचा असल्यानं मागील कित्येक वर्ष बीडीडी चाळीचा पुनर्विकास रखडलेला आहे. त्यामुळं येथील स्थानिक नागरिकांनी या रॅलीच्या विरोधात उघड नाराजी व्यक्त केली. तसंच, परिसरात ठिकठिकाणी बीडीडी चाळींचा पुनर्विकास, मगच मतदान अशाप्रकारे जाहीर निषेधाचे फलक लावले आहेत.  

व्हिडिओ व्हायरल

अरविंद सावंत यांच्या प्रचार रॅलीला विरोध करत प्रवेश नाकारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पुर्नविकासाच्या करारावर स्वाक्षरी होत नाही, तोपर्यंत मतदान नाही, असा आक्रमक पवित्रा बीडीडीच्या रहिवाशांनी घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं.हेही वाचा -

मुंबई इंडियन्सचा दणदणीत विजय, दिल्लीवर ४० धावांनी मात

विक्रोळीत भरधाव ट्रक उलटलून ४ जणांचा मृत्यूसंबंधित विषय
ताज्या बातम्या