Advertisement

'शब-ए-बारात'साठी बेस्ट, पश्चिम रेल्वेची विशेष सेवा

शब-ए-बारात'निमित्त अनेक मुस्लिम बांधव मुंबईतील कबरस्तान व मशीदीना विशेषत: दक्षिण मुंबईतील हाजी अली दर्गा या ठिकाणी भेट देण्यासाठी जातात. या ठिकाणी मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळं त्यांची गैर सोय होऊ नये यासाठी बेस्ट प्रशासन आणि पश्चिम रेल्वेतर्फे जादागाड्या चालविण्यात येणार आहेत.

'शब-ए-बारात'साठी बेस्ट, पश्चिम रेल्वेची विशेष सेवा
SHARES

पूर्वजांच्या स्मृती जपण्यासाठी शहरातील मुस्लिम बांधवांकडून दरवर्षी शब-ए-बारातचा सण साजरा केला जातो. यंदा शनिवारी २० एप्रिल रोजी हा सण साजरा होणार आहे. 'शब-ए-बारात'निमित्त अनेक मुस्लिम बांधव मुंबईतील कबरस्तान व मशीदीना विशेषत: दक्षिण मुंबईतील हाजी अली दर्गा या ठिकाणी भेट देण्यासाठी जातात. या ठिकाणी मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळं त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट प्रशासन आणि पश्चिम रेल्वेतर्फे जादागाड्या चालविण्यात येणार आहेत. 


जादा बसगाड्या

'शब-ए-बारात'निमित्त मुंबईतील भेंडी बाजार, महम्मद अली रोड, माझगांव, डॉकयार्ड रोड, शिवाजीनगर, ट्रॉम्बे, विक्रोळी, सांताक्रूझ आणि मालवणी इथून मोठ्या संख्येन मुस्लिम बांधव कबरस्तान व मशिदींना भेट देण्यासाठी जातात. त्यामुळं त्यांच्या सोयीसाठी शनिवारी रात्री बसमार्ग क्रमांक ८८, २७३ आणि ३५७ या बसमार्गांवर एकूण ७ जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहे.  


२ विशेष लोकल

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीच्या नियोजनासाठी 'शब-ए-बारात'निमित्त पश्चिम रेल्वेतर्फे चर्चगेट-विरार आणि विरार-चर्चगेट मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. शनिवार-रविवारच्या मध्यरात्री चर्चगेट इथून पहिली विशेष लोकल मध्यरात्री २.३५ वाजता सुटणार असून ती विरार येथे ४.१५ वाजता पोहोचणार आहे. तसंच, दुसरी विशेष लोकल विरार इथून १.४२ वाजता सुटणार असून चर्चगेट इथं ३.२२ वाजता पोहोचणार आहे. विशेष लोकल धीम्या मार्गावरील सर्व स्थानकांत थांबणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.



हेही वाचा -

मिलिंद देवरा यांना मुकेश अंबानी, उदय कोटक यांचा पाठिंबा

बीडीडी चाळीतील नागरिकांची अरविंद सावंत यांच्या रॅलीविरोधात नाराजी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा