Advertisement

मंत्रालयातील सरकारी कागदपत्रांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खोटी सही

मुख्यमंत्री सचिवालयातून पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मंत्रालयातील सरकारी कागदपत्रांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खोटी सही
SHARES

मंत्रालयातून प्रसिद्ध होणाऱ्या सरकारी कागदपत्रांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath shinde) यांची खोटी तसेच बनावट शिक्के मारल्याचे आढळून आले आहेत. या प्रकारामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात (Police Station) तक्रार दाखल झाली आहे. 

मंत्रालयात कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के आढळले आहत. मुख्यमंत्री सचिवालयालाने ही बाब निदर्शनास आणून दिली. यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदने तसेच पत्र पुढील कार्यवाहीसाठी मंत्रालयातील विविध खात्यांमधुन तसेच ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयाकडे अंतिम मंजुरीसाठी येत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन ऑफिस प्रणालीत नोंद केली जाऊन संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवण्यात येतात.

नुकत्याच मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद व बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली.

मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दाखल घेतली असून तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. यावरून मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.



हेही वाचा

मुस्लिम समाजालाही आरक्षण देण्याची अबू आझमींची मागणी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा