Advertisement

चर्चा करू, पण आंदोलन सुरूच राहणार; शेतकऱ्यांचा निर्धार

जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मुंबईत ठाण मांडून बसण्याचा निर्णय मोर्चेकरी शेतकऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आलं असून 'चर्चा करू, मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील' असा निर्धार या मोर्चेकरी शेतकऱ्यांनी केला आहे.

चर्चा करू, पण आंदोलन सुरूच राहणार; शेतकऱ्यांचा निर्धार
SHARES

हजारोंच्या संख्येने मुंबईत धडकलेले शेतकरी त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मुंबईत ठाण मांडून बसण्याचा निर्णय मोर्चेकरी शेतकऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रण  देण्यात आलं असून 'चर्चा करू, मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील' असा निर्धार या मोर्चेकरी शेतकऱ्यांनी केला आहे.



मागण्या मान्य करा, नाहीतर घेराव!

६ मार्च रोजी नाशिकहून मोठ्या संख्येने शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी मुंबईच्या दिशेने निघाले. संपूर्ण कर्जमाफी, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, वनजमिनी कसणाऱ्या आदिवासींच्या नावे करणे, शेतकऱ्यांना रास्त भाव म्हणजेच उत्पादन खर्च + ५०% नफा अशा मागण्यांसाठी शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईत सोमवारी हा शेतकरी मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे.


सरकारचं चर्चेचं निमंत्रण

हा मोर्चा मुंबईत पोहोचेपर्यंत मोर्चेकऱ्यांची संख्या २५ हजारांवर गेल्याची माहिती मिळत असून त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि राज्य सरकारवर दबाव वाढू लागला आहे. त्याचाच परिणाम म्हणून भाजपकडून गिरीष महाजन यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन राज्य सरकारच्या वतीन चर्चेचं निमंत्रण दिलं आहे.

शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची सोमवारी मुख्यमंत्र्यांशी भेट घालून चर्चा घडवून आणली जाईल. यामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून योग्य ती चर्चा करून उपाय काढला जाईल. मोर्चादरम्यान कोणताही अनुचिक प्रकार घडला नाही यासाठी मोर्चेकरी शेतकऱ्यांचं अभिनंदन.

गिरीष महाजन, जलसंपदा मंत्री


एकीकडे चर्चा, दुसरीकडे मोर्चा

दरम्यान, राज्य सरकारकडून आलेलं निमंत्रण मोर्चेकरी शेतकरी बांधवांनी सकारात्मकतेने घेतलं असलं, तरी 'मागण्या मान्य होईपर्यंत कोणतीही तडजोड नाही' असा स्पष्ट निर्धार त्यांनी केला आहे. राज्य सरकारशी चर्चा जरी होणार असली, तरी त्यावेळी मोर्चा मात्र सुरूच राहाणार आहे, मुंबईतून रिकाम्या हाती जाणार नाही असाही निर्धार मोर्चेकरी शेतकरी बांधवांनी बोलून दाखवला आहे.

जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि त्यांचं मीडियासमोर खुल्लम खुल्ला लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. जर चर्चा यशस्वी झाली नाही, तर विधानभवनाला घेराव घालणारच.

अजित नवले, सचिव, किसान मुक्ती मोर्चा


शिवसेना खांद्याला खांदा लावून लढणार

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन शिवसेनेचा आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचं आश्वासन दिलं.

शिवसेनेचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे. आणि जर गरज पडली, तर तुमच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात उतरून मागण्या मान्य करून घेऊ.

आदित्य ठाकरे, नेते, शिवसेना


गरज असेल, तरच घराबाहेर पडा!

मोर्चेकरी शेतकऱ्यांची संख्या अधिकाधिक वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडूनही योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मुंबईतील प्रमुख रस्त्यांची वाहतूक व्यवस्था बदलण्यात आली असून आवश्यकता असेल, तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. रविवारी रात्री सायन येथील सोमय्या मैदानावर मोर्चेकरी शेतकरी बांधव मुक्काम करणार आहेत.



हेही वाचा

२५ हजार शेतकरी आणि शांततापूर्ण आंदोलन


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा