Advertisement

२५ हजार शेतकरी आणि शांततापूर्ण आंदोलन


२५ हजार शेतकरी आणि शांततापूर्ण आंदोलन
SHARES

मुंबईने आजपर्यंत अनेक आंदोलनं, निदर्शनं, मार्च, मोर्चे पाहिलेत. अशा अनेक मोर्चांमध्ये बऱ्याचदा हिंसक घटना, चोरीच्या घटना किंवा छेडछाडीसारखे प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. मात्र आपल्या रास्त मागण्यांसाठी नाशिकहून निघालेल्या २५ हजार शेतकऱ्यांच्या लाँग मार्चमध्ये अद्याप असा कोणताही प्रकार घडल्याचं समोर आलेलं नाही.


२५ हजार शेतकरी मुंबईत दाखल

सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी नाशिकमधून शेतकरी बांधव मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. सुमारे २५ हजार शेतकरी मुंबापुरीत आले असून उद्या म्हणजेच सोमवारी हे लाल वादळ थेट विधानभवनावर धडकणार आहे.

नाशिकमधून ७ मार्चला या लाँग मार्चची सुरूवात झाली. तब्बल १६५ किलोमीटरचं हे अंतर. आणि २५ हजाराचा जमाव! पण सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व अंतर हा एवढा मोठा जमाव पायीच पार करणार होता! त्यामुळे एकीकडे शेतकरी बांधव त्यांची भूमिका आक्रमकपणे मांडत असतानाच दुसरीकडे पोलिस आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनावरचा दबाव वाढत होता. कोणत्याही परिस्थितीत अनुचित प्रकार टाळण्याचं आव्हान या यंत्रणेसमोर होतं. पण त्यांचा भार या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनीच हलका केला.

गेल्या तीन दिवसांमध्ये या मार्चमुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना वा अनुचित प्रकार घडल्याचं समोर आलेलं नाही. त्यामुळे अत्यंत शिस्तीत सुरू झालेला हा लाँग मार्च तेवढ्याच शिस्तीत मुंबईत दाखल झालेला आहे. आणि पुढचं आंदोलनही त्याच शिस्तीत करण्याचा आंदोलनकर्त्या शेतकरी बांधवांचा मानस आहे. या लाँगमार्चच्या माध्यमातून या शेतकरी बांधवांनी शांततापूर्ण पद्धतीने तुमचं म्हणणं कसं माडायचं, याचा एक आदर्शच घालून दिला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा