Advertisement

गिरीश बापट यांच्या बंगल्याला आग

अग्शिनशम दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी आल्या आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. सुदैवाने आग लागली तेव्हा कोणीही सर्व्हंट क्वार्टरमध्ये नव्हते.

गिरीश बापट यांच्या बंगल्याला आग
SHARES

राज्याचे अन्नपुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या बंगल्यातील सर्व्हंट क्वार्टरला सोमवारी आग लागल्याची दुर्घटना घडली. मलबार हिल या उच्चभ्रू वस्तीमध्ये गिरीश बापट यांचा ज्ञानेश्वरी हा बंगला आहे. रात्री नऊ वाजताच्या सुमारास इथल्या सर्व्हंट क्वार्टरमध्ये अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, या ब्रिटीशकालीनी सर्व्हंट क्वार्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर लाकडाचे सामान होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बापट हे मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे


सुदैवानं जीवितहानी नाही

मलबार हिल परिसरात अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा ज्ञानेश्वरी बंगला आहे. बंगल्याच्या सर्व्हंट क्वार्टरला सोमवारी अचानक आग लागली. आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बापटांच्या बंगल्यापासून काही अंतरावरच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचाही बंगला आहे. सर्व्हंट क्वार्टरला आग लागलेली पाहताच गिरीश महाजन यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला कळवले. यानंतर तातडीनं अग्शिनशम दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी आल्या आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. सुदैवाने आग लागली तेव्हा कोणीही सर्व्हंट क्वार्टरमध्ये नव्हते.


गिरीश बापट मुंबईकडे रवाना

सुरुवातीला सर्व्हंट क्वार्टरमधील सिलेंडरचा स्फोट झाल्यानं भीतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र, अग्निशमन दलानं वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. गिरीश बापट यांच्या बंगल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा आणि महादेव जानकर यांचे बंगलेही जवळच्या अंतरावर आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गिरीश बापट तातडीनं मुंबईकडे रवाना झाले


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा