• हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना एक दिवसाची पोलीस कोठडी
  • हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना एक दिवसाची पोलीस कोठडी
  • हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना एक दिवसाची पोलीस कोठडी
SHARE

मुलुंड - भाजपा खासदार किरिट सोमय्या यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पाच शिवसैनिकांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मंगळवारी रात्री शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये रावण दहनावरून बाचाबाची झाली होती. महापालिकेचा भ्रष्टाचार आणि माफियाराज यांच्या प्रतीकात्मक रावण पुतळ्याचं दहन सोमय्या यांनी आयोजित केलं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी सोमय्यांच्या कार्यालयाजवळ सोमय्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यावर हल्ला केला होता. या प्रकरणी 10 जणांविरोधात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी सुनील गारे, निलेश सावंत, निलेश ठक्कर, किशोर भोईर, किरण नांदे या पाच आरोपींना अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या