Advertisement

कडक धोरणात जरा बदल करा, शरद पवारांची पोलिसांना सूचना


कडक धोरणात जरा बदल करा, शरद पवारांची पोलिसांना सूचना
SHARES

कोरोना व्हायरसचा (coronavirus) संसर्ग वाढू नये म्हणून देशाभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांना कडक भूमिका घेत असले, तरी आता परिस्थितीत बराच फरक पडला आहे. त्यामुळे पोलिसांनी हे लक्षात घेऊन आपल्या धोरणात बदल केला पाहिजे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ncp chief sharad pawar) यांनी केली आहे. 

शरद पवार यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था (law and order) या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला.

सध्या राज्यात संचारबंदी असली, तरी जीवनावश्यक वस्तूंच्या (essentials good) खरेदीसाठी लोकांना घराबाहेर पडावंच लागत आहे. अशा स्थितीतही पोलिसांकडून (police) लोकांना दमदाटी करण्यात येत आहे. कुठलीही विचारपूस न करता पोलीस आपल्या हातातील काठी चालवत आहेत. कर्तव्यावरून परत येत असलेल्या पोलिसाला आणि एका नर्सला पोलिसांनी काठीने बडवलं. एवढंच नाही तर एका पत्रकारालाही पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली. याचे पडसाद जनतेत आता उमटू लागले आहेत. या सर्व बाबींवर शरद पवार यांनी बोट ठेवलं. 

लोकांचं सहकार्य

शरद पवार म्हणाले, लोकांनी स्वयंशिस्तीने वागण्याची सध्या गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरू नका,असं अनेकवेळा सांगण्यात येऊनही काही लोकं रस्तावर येत आहेत. त्यामुळे इच्छा नसली तरीही पोलिसांना सुरूवातीला काही कठोर निर्णय घ्यावे लागले. त्यांचा परिणाम आज दिसतोय. लोकांचं सहकार्य मिळत आहे ही समाधान गोष्ट आहे.

धोरणात बदल करावा

 जनता घरातच थांबण्याच्या सूचना पळत असली तरीही काही ४ ते ५ टक्के लोकं अजूनही चुकीचं वागत आहेत, त्यांच्यासाठी पोलिसांनी थोडी कठोर भूमिका घेतली आहे. पण आपल्याच सुरक्षेसाठी ती आपण सहन केली पाहिजे. पोलिसानींही परिस्थिती बदलत आहे हे लक्षात घेऊन आपल्या धोरणात थोडा बदल केला पाहिजे. 

सहकार्य करा

वैद्यकीय सेवांसाठी काम करणाऱ्या वर्गाला घेऊन ये-जा करणाऱ्या वाहनांवर बंधने आणू नयेत. ते ज्या ठिकाणी काम करतात त्याठिकाणचे ओळखपत्र त्यांना द्यावं. ते दाखवल्यानंतर पोलीस व अन्य घटकांनी त्यांना अडवू नये. हे सर्वजण आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, त्यामुळे त्यांना सहकार्य करावे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement