Advertisement

'अरुण गवळी संत फकीर'


SHARES

मुंबई - गँगस्टर अरूण गवळीच्या जीवनावर डॅडी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यानिमित्त ‘मुंबई लाइव्ह’नं डॅडींची पत्नी आशा गवळी यांच्याशी खास बातचीत केली. डॅडी हे सध्या जेलमध्ये असले तरी ते आमच्या सोबतच आहेत असं आशा गवळी म्हणाल्या. आमच्या प्रेमाची कहाणी सांगायला तीन तासांचा अवधी हा खूपच कमी असून, त्यांच्या 35 वर्षांच्या प्रेम कहाणीला त्यांनी साक्षात भगवंताची उपमा दिली. प्रेमाला जात नाही, वेळ नाही, काळ नाही असं देखील त्या म्हणाल्या. लोक, प्रसारमाध्यम भले माझ्या नवऱ्याला गँगस्टर म्हणत असतील पण माझ्या मते ते एक फकीर आहेत. ‘दगडी चाळ’च्या निर्मात्यांनी आम्हाला न विचारताच पिक्चर बनवला. मात्र या चित्रपटाचे दिग्ददर्शक मला, डॅडींना येऊन भेटले, पण शेवटी तो पिक्चर असून, त्यात सत्य कधी दाखवलं जात नसल्याची खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच जसं आहे तसेच आम्हाला दाखवा असं त्या ‘मुबई लाईव्ह’शी बोलताना म्हणाल्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा