Advertisement

बापरे! राज ठाकरेंच्या सभेत एवढी मोठी एलईडी स्क्रिन

एवढा मोठा एलईडी स्क्रिन देशातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या विधानसभेत वापरण्यात आलेला नाही.

बापरे! राज ठाकरेंच्या सभेत एवढी मोठी एलईडी स्क्रिन
SHARES

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यासोबतच राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत कार्यकर्त्यांना संबोधित केले.

माहीम येथील बेकायदा दर्गा स्टेजवर मोठ्या एलईडी स्क्रीनवर दाखवून राज ठाकरेंनी लोकांना थक्क केले. महिनाभरात हा बेकायदेशीर दर्गा हटवला नाही, तर पुढे गणपती बाप्पाचे मोठे मंदिर उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.

सर्वांचे डोळे एलईडी स्क्रीनवर

राज ठाकरेंच्या सभांमध्ये ऑडिओ आणि व्हिज्युअलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. 'लाव रे तो व्हिडिओ' राज ठाकरेंचे शब्द आजही लोकांच्या ओठावर आहेत.

मात्र, यावेळीही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरेंच्या मंचावर लावण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनचीही जोरदार चर्चा आहे. राज ठाकरेंच्या या सभेत देशात प्रथमच एवढा मोठा एलईडी स्क्रीन वापरण्यात आला. आतापर्यंत देशात कोणत्याही राजकीय पक्षाच्या रॅली किंवा सभेत एवढा मोठा एलईडी स्क्रीन वापरण्यात आलेला नाही. या एलईडी स्क्रीनचा आकार ५०x२८ फूट होता.

एलईडी स्क्रीनचा जास्त वापर

गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी LED स्क्रीनवर माहीमच्या बेकायदेशीर दर्गाशिवाय पाकिस्तानात दिलेले गीतकार जावेद अख्तर यांचे विधान दाखवले.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा