Advertisement

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक


माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक
SHARES

माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या नऊ आठवड्यांपासून वाजपेयी यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. ९३ वर्षांचे वाजपेयी किडनीच्या आजारानं त्रस्त असून सध्या त्यांची प्रकृती अधिकच खालावली आहे.



पंतप्रधानांनी केली विचारपूस

किडनी संसर्गाने त्रस्त असल्याने 11 जूनला वाजपेयी यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सुरेश प्रभू, यांच्यासह इतर नेत्यांनी एम्समध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारणा केली आहे. केंद्रीय मंत्र्यांनीही वाजपेयींच्या प्रकृतीची वाचारपूस केली. तर अनेक नेत्यांनी ट्वीट करून त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे.


मोदीं यांच्याबरोबरच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सुद्धा रुग्णालयात जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची डॉक्टरांकडे विचारणा केली होती.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा